Chhagan Bhujbal: छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

 


Chhagan Bhujbal meet Sharad Pawar : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ हे आज अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले.



मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज (सोमवारी) सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver Oak) येथे दाखल झाले. छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवार(Sharad Pawar) यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.

               👉🗣️👇👇👇

   पाहा काय म्हणाले छगन भुजबळ





Post a Comment

Previous Post Next Post