नेपाळमध्ये महापूराची विदारक दृश्य समोर; विनाशाचे व्हिडीओ, सॅटेलाईट इमेज पाहा
Nepal Tibet Flash Flood Disaster: नेपाळ आणि तिबेटच्या हिमालयीन सीमावर्ती भागात आलेल्या अचानक पुरामुळे कमीत कमी १६५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पर्यटकांसह शेकडो लोक बेपत्ता आहेत. भारतातही काही ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. भीषण पुरामुळे झालेल्या विनाशाची विदारक दृश्य आता समोर येऊ लागली आहेत.
👉व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈
भोटेकोशी नदीला पूर
चीन आणि नेपाळ दरम्यान वाहणाऱ्या ल्हेन्डे नदीच्या काठावरून माती आणि ढिगाऱ्याचा एक भलामोठा तुकडा कोसळल्याने ही विनाशकारी पूरपरिस्थिती निर्माण झाली. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भोटेकोशी नदीला पूर आला. या पुरात अनेक गावे, रस्ते, घरे, पूल आणि जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले. नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
.
👉व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈
.
नेपाळमधील मदत व बचाव कार्यादरम्यान घेण्यात आलेल्या हवाई चित्रफितीमध्ये पुरामुळे गावांमध्ये माती आणि चिखल पसरल्याचे दिसत आहे. नेपाळी लष्कराकडून विमानांद्वारे बचाव कार्य सुरू असून शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, तर धोकादायक क्षेत्रात नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात गेलेल्या बहुमजली इमारतींमधून बचाव पथकांनी चिखल आणि गाळातून वाट काढत शोधमोहीम राबवली.
