दारू सोडायला गेलेल्या दारुड्याला बाबानी…. धु धु धुतला व्हिडिओ व्हायरल




दारू माणसाला काहीही करायला लावू शकते. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. तसेच तुम्ही काही लोकांना असे करताना पाहिले असेल. सदैव शांत राहणारा माणूस दारू पिऊन अचानक ‘वाघ’ बनतो आणि आकाशातील चंद्र-तारे तोडल्याचा अभिमान बाळगतो. मात्र, दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असूनही असे लोक दारू पिणे सोडत नाहीत.


              दारू छुड़ाने वाला बाबा😱 

          👉पाहा वायरल व्हिडिओ 👈

काही लोकांना त्याचे इतके व्यसन लागले आहे की ते सोडणे त्यांच्यासाठी अशक्य होते. अशा वेळी काही लोक या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी एखाद्या केंद्रात, कॅम्पमध्ये तर कधी कधी आपल्या बुवा-बाबांकडेही जातात. दरम्यान, दारूचे व्यसन सोडवण्यासाठी अशी व्यक्ती एका ‘बाबा’कडे आली, तेव्हा त्याचे काय झाले ते पहा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहिल्यानंतर तुम्हीही हसाल.

           दारू छुड़ाने वाला बाबा😱 

          👉पाहा वायरल व्हिडिओ 👈



या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या बाबाने मद्यपीला समोर बसायला सांगितले. त्यानंतर त्याचे केस पकडून त्याची धुलाई केली. त्याचे केस पकडून एखाद्या आरोपीला पोलीस जसे फटकावतात तसे या बाबाने या मद्यपीच्या कानाखाली लगावल्याचे दिसत आहे. मधेच ते त्याला खाली वाकवून, त्याच्या पाठीवरही मारताना दिसत आहेत. दारू सोडविण्याचा असा उपाय तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.



Post a Comment

Previous Post Next Post